Nag Panchami Essay In Marathi: भारत हा सणांचा देश म्हणून ओळखला जातो. इथे वर्षभरात अनेक प्रकारचे सण साजरे केले जातात. काही सण हे निसर्गाशी संबंधित असतात, काही देव-देवतांशी, तर काही लोककथांवर आधारित असतात. अशाच खास आणि वेगळ्या प्रकारच्या सणांपैकी एक म्हणजे नागपंचमी. नागपंचमी हा एक असा सण आहे, जिथे सापासारख्या जीवाची पूजा केली जाते. ऐकायला थोड विचित्र वाटेल, पण हिंदु संस्कृतीच अशी आहे. इथे प्रत्येक जीवात देव पाहिला जातो, मग तो साप का असेना.
Table Of Content
Nag Panchami Essay In Marathi: नागपंचमी निबंध मराठी
नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील एक मुख्य सण आहे. त्यामुळे याला नागपंचमी असे नाव पडले आहे. या दिवशी घराघरांमध्ये नागदेवतेची पूजा केली जाते. सापाला दूध, फुले, हळद-कुंकू वाहिल जात. मातीचे किंवा धातूचे नाग आणून घरात त्यांची पूजा केली जाते. काही ठिकाणी नागदेवतेचे चित्र भिंतीवर काढून पूजा केली जाते. बायका उपवास करतात, पूजा करून कथा ऐकतात. या दिवशी विशेष जेवणही बनवले जाते, जस की पुरणपोळी, भजी, साखरपोळी, आमटी-भात वगैरे. सर्व घरात आनंदाच वातावरण असत.
आपल्या पौराणिक कथांमध्ये सापांच महत्त्व खूप आहे. विष्णू भगवान शेषनागावर विसावले आहेत, भगवान शिवाच्या गळ्यात नाग आहे. लक्ष्मीदेवी नागाची बहीण मानली जाते. नाग हिंदू संस्कृतीमध्ये किती महत्त्वाचा आहे हे यावरून लक्षात येत.
महाभारतामध्ये एक कथा आहे. जनमेजय नावाच्या राजाने एकदा सर्पयज्ञ केला, म्हणजे साप मारण्यासाठी यज्ञ केला होता. पण नंतर त्याला समजल की साप मारण चुकीच आहे. त्यांनी तो यज्ञ थांबवला आणि नागपंचमी साजरी करण्याची सुरुवात झाली. ही गोष्ट आजही लोककथांमधून अनेक ठिकाणी सांगितली जाते.
लोकांमध्ये एक श्रद्धा आहे की नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने आपल संरक्षण होत. विशेषतः भावंडांच नात जपण्यासाठी हा सण महत्त्वाचा मानला जातो. एक प्रसिद्ध गोष्ट अशी आहे की एका बहिणीने आपल्या भावासाठी नागपंचमीला उपवास केला होता. काही दिवसांनी तिच्या भावाला साप चावला. पण बहिणीच्या प्रार्थनेमुळे त्याचा जीव वाचला. म्हणूनच आजही अनेक बहिणी या दिवशी उपवास करून नागदेवतेची पूजा करतात आणि आपल्या भावाच्या रक्षणासाठी प्रार्थना करतात.
साप हा प्राणी माणसाला घाबरवणारा वाटतो, पण प्रत्यक्षात तो निसर्गाचा एक महत्त्वाचा घटक आहे. शेतीमध्ये उंदीर, बेडूक, कीटक खाऊन तो शेताच नुकसान टाळतो. त्यामुळे साप माणसाचा शत्रू नसून मित्रच आहे. तो त्याला इजा झाल्याशिवाय हल्ला करत नाही. त्यामुळे नागपंचमीसारखा सण आपल्याला हे शिकवतो की निसर्गातील प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे. आपण त्यांच्याशी जपून आणि समजून वागायला हव.
नागपंचमी सणाचे एक सामाजिक आणि वैज्ञानिक महत्त्वही आहे. श्रावण महिना हा पावसाळ्याचा महिना असतो. या दिवसात साप त्यांच्या बिळातून बाहेर पडतात. त्यामुळे त्यांना त्रास होऊ नये म्हणून या दिवशी त्यांना मारू नये, त्यांची पूजा करावी, अशी आपली श्रद्धा आहे. ही श्रद्धा प्रत्यक्षात एक प्रकारे सापांच संरक्षणच करते. यामुळे लहानपणापासूनच आपल्या मनात सापांविषयी भीतीपेक्षा आदर निर्माण होतो.
आधुनिक काळात काही ठिकाणी नागपंचमीच्या दिवशी साप पकडून आणले जातात आणि त्यांना दूध पाजल जात, त्यांची पूजा केली जाते. पण यामुळे सापांच्या जीवाला धोका निर्माण होतो. आता प्राणीमित्र संस्था आणि वनविभाग या गोष्टींवर लक्ष ठेवतात. ते लोकांना समजावतात की सापांना पकडू नका, त्यांना त्रास देऊ नका. आपण मातीचे किंवा चित्ररूप नाग आणूनही पूजा करू शकतो. त्यामुळे आपली श्रद्धा राहील आणि सापांच जीवनही वाचेल.
नागपंचमी म्हणजे फक्त एक धार्मिक सण नाही, तर तो निसर्ग आणि जीवसृष्टी यांच्यातील नात्याच प्रतीक आहे. आपल्या संस्कृतीमध्ये झाड, प्राणी, पक्षी, नद्या सगळ्यांमध्ये देव पाहिला जातो. यामुळे आपण निसर्गाशी जोडले जातो. नागपंचमी हा सण आपल्याला शिकवतो की साप हा घातक प्राणी नसून उपयुक्त आहे. आपण त्याच रक्षण केल पाहिजे.
या दिवशी ग्रामीण भागात गोंधळ, झिम्मा, फुगडी, पोवाडे असे लोकनृत्य सादर केले जातात. काही ठिकाणी नाज गाणी करून नागोबाच्या गाण्यांवर नृत्य केल जात. मुलमुली नाचतात, गाणी म्हणतात. गावात उत्साहाच वातावरण असत. नागपंचमीच्या दिवशी गावात एक प्रकारची ऊर्जा अनुभवायला मिळते. बायका एकत्र येतात, पूजा करतात, कथा सांगतात. लहान मुल सापाविषयी गोष्टी ऐकतात. सण साजरा करताना सगळे एकत्र येतात, यामुळे समाजात एकात्मता वाढते.
पूर्वी सापाविषयी खूप अंधश्रद्धा होत्या. काही लोक सापाला देव मानून त्याला दुधात बुडवून ठेवीत. पण आता लोक शिक्षित झालेत, विज्ञानाचा विचार करू लागले आहेत. त्यामुळे अशा अंधश्रद्धा कमी होऊ लागल्या आहेत. नागपंचमी साजरी करतानासुद्धा सापांच्या हक्कांची जाणीव ठेवली जाते. त्यांना त्रास न होता पूजा करणे, हेच आजच्या काळात योग्य आहे.
आपल्या देशात अनेक प्रकारचे सण आहेत. पण नागपंचमीसारखा सण फार थोड्या देशात साजरा केला जातो. सापाला देव मानण, त्याची पूजा करण ही गोष्ट इतर देशांना कदाचित विचित्र वाटेल. पण हीच गोष्ट आपली संस्कृती वेगळी आणि समृद्ध बनवते. आपल्याकडे प्रत्येक जीवात ईश्वर पाहिला जातो. ही दृष्टी आपल्याला इतरांपेक्षा वेगळी करते.
हे निबंध पण वाचा: वटवृक्षाचे मनोगत मराठी निबंध
निष्कर्ष
नागपंचमी आपल्याला शिकवते की निसर्गाच रक्षण करण, प्रत्येक जीवाशी सहज राहण, हेच आपल कर्तव्य आहे. श्रद्धा आणि विज्ञान यांचा समतोल साधून आपण हे सण साजरे केले पाहिजेत. साप फक्त डसणारा नाही, तर निसर्ग रक्षण करणारा प्राणी आहे, हे समजण महत्त्वाच आहे. म्हणूनच नागपंचमी साजरी करताना आपण केवळ पूजा करून थांबू नये, तर सापांविषयीचा आदर, निसर्गाविषयी प्रेम आणि पर्यावरणाविषयी जबाबदारी याची जाणीव ठेवली पाहिजे. असा सण म्हणजे श्रद्धा, विज्ञान आणि निसर्ग यांचा सुंदर संगम आहे.